Site icon HW News Marathi

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला

मुंबई | कथित 100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख  (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्ज विशेष सीबीआय (CBI) न्यायालयाने फेटाळाला आहे. यामुळे देशमुखांची यंदाची दिवाळीही तुरुंगातच जाणार आहे. देशमुखांवर 100 कोटी वसुलीप्रकरण आणि मनी लाँड्रिग प्रकरण या दोन्ही प्रकरणात ईडी आणि सीबीआने गुन्हा दाखल करत अटक केला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाकडून ईडीने दाखल केल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळाला आहे. मात्र, सीबीआयकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळालेला नव्हता. या प्रकरणी न्यायालयात आज (21 ऑक्टोबर) सुनावणी पार पडली.

दरम्या, देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने दोन्ही बाजूने युक्तीवाद गुरुवारी (20 ऑक्टोबर) पूर्ण झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने आज निकाल राखून ठेवला होता. परंतु, अखेर न्यायालयाने देशमुखांच्या जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच देशमुखांना ईडीने दाखल केलेल्या गुन्हात जामीन मंजूर केला होता. पण, सीबीआयने देशमुखांना जामीन मंजूर केला नव्हात. यामुळे देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी न्यायालयाने ही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले होते.

सीबीआयतर्फे गुरुवारी अतिरिक्त महान्यायअभिकर्त अनिल सिंह यांनी न्यायालयात पूर्ण केला. या प्रकरणात देशमुख आणि सीबीआय दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर विशेष न्यायालयाने न्या. एस. एच. ग्वालानी यांनी आज निकाल दिला. देशमुखांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

सीबीआयने जामीन अर्ज फेटाळताना म्हणाले

विशेष सीबीआय न्यायालयाने देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळता म्हटले, “देशमुखांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार आहे. आणि देशमुखांना तुरुंगात योग्य ते वैद्यकीय उपाचर मिळत असून या प्रकरणातील माफीचा साक्षीदार झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जबाबाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.”

संबंधित बातम्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर विशेष सीबीआय न्यायालय आज देणार निकाल

 

 

 

 

Exit mobile version