Site icon HW News Marathi

माजी गृहमंत्री अनिल देशमुख उद्या तुरुंगातून बाहेर येणार

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळला आहे. देशमुखांच्या जामीन याचिका स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे देशमुखांच्यी जामीनाला मिळालेली वाढीव स्थगितीची मुदत आज (27 डिसेंबर) संपली. या पार्श्वभूमीवर न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडली. यावेळी देशमुखांच्या जामिनावर स्थगिती वाढवण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने न्यायालयात केली होती.

दरम्यान, सीबीआयची मागणी न्यायालयाने आज फेटाळून लावली. यामुळे आता देशमुखांची कारागृहातून सुटका होणार आहे. देशमुख हे उद्या (27 डिसेंबर) सायंकाळी 4.30 वाजता ऑर्थर रोड कारागृहातून सुटका होणार आहे. न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त देशमुखांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयाच्या सीबीआय न्यायालयाने देशमुखांचा जामीन नाकारला होता. यानंतर देशमुखांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती. यानंतर उच्च न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केला आहे.

नेमके काय आहे प्रकण

2021 मध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी वसुलीप्रकरण आणि मनी लाँड्रिग प्रकरण्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.  दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेशे देशमुखांनी दिल्याचे त्यांनी म्हटले होते. हा प्रकार मध्यमांमध्ये आल्यानंतर एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी देशमुखांना डिसेंबर 2021 रोजी ईडीने अटक केले होते. तेव्हापासून देशमुख हे तुरुंगातच आहेत. यानंतर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळाला होता. परंतु, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला नव्हता. अखेर आज देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे.

 

 

 

 

Exit mobile version