Site icon HW News Marathi

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ED कडून अटक

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना एनएसई फोन टॅपिंग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. पांडेंनी 2009 ते 2017 काळात बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी पाडेंना अटक करण्यात आली आहे. संजय पांडेंवर दोन वेगवेगळ्या प्रकरणी ईडी चौकशी करत होती. याआधी संजय पांडेंवर एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांचा बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच सीबीआयने संजय पांडेंच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरावर छापे देखील केली होती.

दरम्यान, संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यानंतर ईडीने त्या चौकशीची नोटीस पाठवली होती. या प्रकरणी ईडीने संजय पांडे यांची चौकशी देखील केली होती. संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होण्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदभार सांभाळला आहे.

पोलीस सेवेतील संजय पांडे कारकीर्द

  • आयआयटी कानपूरमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण
  •  1986 च्या बॅचमधील IPS अधिकारी
  •  सर्वात आधी पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहरात कामाला सुरुवात
  •  मुंबईतील डीसीपी रँकचे अधिकारी बनले
  •  1992 मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना
  • 1992-93 दंगलीच्या वेळी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख श्री कृष्णा आयोगाच्या अहवालात आहेमुंबईत चार हायप्रोफाईल पोलीस स्टेशन मिळून झोन 8 बनवलं, याचे पहिले डीसीपी संजय पांडे बनले. जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला
  • 1993 मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या दादागिरीला लगाम लावला.
  • 1995 मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला1997 इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करुन भ्रष्टाचाराचा उलगडा केला.
  •  1998 मध्ये पुढील शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात गेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
  • 1999 मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात होते
  • 2001 मध्ये राजीनामा दिला, परंतु तो मंजूर केला नाही, प्रकरण कोर्टात गेलं.
  • 2005 मध्ये सेवेत पुन्हा आले आणि कारकीर्दीतील 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक्त केली, पण ती पूर्ण झाली नाही.
  •  कोर्टातील लढ्यानंतर 2011 मध्ये पुन्हे सेवेत रुजू झाले.
  •  2014-15 लीगल मॅट्रोलॉजी डिपार्टमेंट कंट्रोलर मेजरमध्ये असताना बिल्डरांकडून फ्लॅट्सच्या कार्पेट एरियातील चोरी उघड केली. लोढा बिल्डरवर कारवाईही केली.
  •  2015 मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले आणि याच पदावर राहून महासंचालकही झाले.
  •  अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांना नियुक्ती दिली. तर संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवलं.
  • 9 एप्रिल रोजी संजय पांडे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.
  • संजय पांडे यांच्या निवृत्तीपूर्वी ते मुंबई पोलीस आयुक्ताचा पदभार संभाळला
Exit mobile version