Site icon HW News Marathi

भिमा-कोरेगाव प्रकरणात एकबोटेंच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी

पुणे – भिमा-कोरेगाव प्रकरणात मिलिंद एकबोटे त्यांना अटकपूर्व जामीनाचे याचिकेवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यांना अटक होणार की जामीन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. याआधी एकबोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. पण, न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर एकबोटे यांनी पुण्यातील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्च केला होता. पण, न्यायालयाने देखील २२ जानेवारी त्यांची याचिका फेटाळली.

भिमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला वदंना करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर जमावाने हल्ला केला होता. त्यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण झाला होता. या प्रकरणात मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिंड गुरुजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Exit mobile version