HW News Marathi
क्राइम

बँक मॅनेजर पतीची पत्नीने सुपारी देऊन केली हत्या

औरंगाबाद- बँक व्यवस्थापक जितेंद्र होळकर यांच्या हत्या प्रकरणाचा अवघ्या २४ तासात उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची कबुली पत्नी भाग्य होळकरने दिली आहे. दरम्यान, सुपारी घेणारी व्यक्ती शिवसैनिक असल्याचे उघडकीस आले असून त्याला पोलिसांनी अटक केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शेकटा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक असणाºया जितेंद्र होळकर यांची शुक्रवारी मध्यरात्री हत्या करण्यात आली. गच्चीवरून घरात प्रवेश करून चोरट्यांनी होळकरांची हत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज होता. परंतु तपासात तसे काही निष्पन्न झाले नाही. मारेकºयांनी होळकर यांना खुर्चीवर बसवून, त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या उजव्या हाताचे बोट कापले. त्यानंतर त्यांचा गळा चिरण्यात आला. हे सर्व कृत्य शांत डोक्याने करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे सर्व कृत होळकर यांच्या पत्नी दोन लाखांची सुपारी देऊन घडवून आणळे. भाग्यश्री होळकर हिने शिवसैनिक किरण गणोरे याच्यामार्फत फैय्याज आणि बाबू यांना पतीच्या हत्येसाठी दोन लाख रूपयांची सुपारी दिली होती. गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्या हत्येचा कट रचला जात होता. त्यासाठी भाग्यश्रीने फैय्याझ आणि बाबू यांना दोन लाखांपैकी दहा हजार रुपए अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले होते. उर्वरित एक लाख ९० हजार रुपये रक्कम अद्याप दिलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे सोलापूर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच

News Desk

उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

News Desk

बोधडी येथे जुगार अड्यावर छापा, ११ जणांसह ६ लाखाचा मुद्देमाल केला जप्त

News Desk