Site icon HW News Marathi

क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; मालाडमधून ३१९९ मोबाईल जप्त

मुंबई | मुंबई शहरातमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस कॉलसेन्टरद्वारे बऱ्याच नागरीकांची आर्थिक फसवणूक होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 11 दिली आहे. पोलीस निरीक्षक सचिन गवस यांना काल (20 जुलै) कक्ष कार्यालयाचे पोलीस निरीक्षक सचिन गवस यांना गोपनीय माहिती मिळाली. मालाड पश्चिमेच्या काचपडा परिसरातील नीओ कॉर्पोरेट प्लाझाच्या दुसऱ्या मजल्यावर फेसबुक, इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडीयावर चंदा इंटरप्रायजेस या कंपनीतर्फे रिनों, ओपो इत्यादी नामांकित कंपनीच्या मोबाईलची जाहिरात देवून, मोबाईल ४२९९ रुपये किंमतीला उपलब्ध आहे, अशा प्रकारे संपूर्ण भारतातील ग्राहकांना स्वस्तात मोबाईल विक्री करण्याचे आमिष दाखवून, ग्राहकाने जाहिरातीवर नोंदणी केल्यानंतर तात्काळ त्या फोनकरुन त्यांचा पत्ता घेवून स्वतःच्यावरील कार्यालयात बंद असलेले मायक्रोमॅक्स, अॅपल ट्री व व्हिडीओकॉन कंपनीचे जुने मोबाईल बॉक्समध्ये पॅकींगकरुन ई कॉम एक्सप्रेस व ई कार्ट या कुरीअर कंपनीद्वारे पाठवून ग्राहकांकडून कॅश ऑन डिलीव्हरी घेवून मुंबईबाहेरील हजारो लाखो ग्राहकांची फसवणूक करत होते.

 

दरम्यान, या घटनेच्या ठिकाणी पोलीस पथकसह कॉम्युटर तज्ञ यांच्या मदतीने छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान सत्यता समजून आली. ताब्यात घेतलेले २ आरोपी व त्यांचे इतर साथीदार अशांनी मिळून फेसबुक, इंन्टाग्रामवर ओपो, रेनो ए ११ प्रो या मोबाईलची ४२९९ रुपयामध्ये देतो असे भासवून कुरीअरद्वारे खराब झालेले, बंद असलेले मायक्रोमॅक्स, अॅपल ट्री, व्हिडीओकॉन या कंपन्याचे फोन देवून फसवणूक करत होते. क्राईम ब्रांचकडून तब्बल १,३७,५२,५०१ (रुपये एक कोटी सदतीस लाख बावन्न हजार पाचशे एक) रुपयांचे ३१९९ मोबाईल जप्त करण्यात आलेले असून आरोपी हे कृत्ये मागील ५ वर्षापासून करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

दोन्ही आरोपींविरुध्द मालाड पोलीस ठाण्यात भा.द.वी चे कलम ४२०, ३४ त्याचसोबत आय टी ऍक्ट २००५ चे कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास कक्ष ११ कार्यालयाकडून चालू आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे.

Exit mobile version