Site icon HW News Marathi

अंबानींच्या कुटुंबीयाना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबीयांना आज जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुकेश अंबानी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एमएचबी कॉलीनीमधून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. अंबानींना रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाच्या दूरध्वनीवर आज (15 ऑगस्ट) सकाळी अज्ञात व्यक्तीने ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर अवघ्या पाच तासांत पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.  डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तातडीने तपास करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी बोरिवलीतील एमएचबी कॉलनीमधून एका 57 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला व्यक्ती हा मानसिक आजारी असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव विष्णू भूमीक असे आहे.

अंबानींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीने आठ फोन कॉल आले असून या फोन कॉलची पोलीस चौकशी करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या आरोपीने तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करण्याची धमकी फोनवरून दिली होती. पोलिसांचे एक पथक रुग्णालयात दाखल झाले आहेत. यानंतर पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

 

 

Exit mobile version