Site icon HW News Marathi

अमरावतीतील लव्ह जिहाद प्रकारणात आता नवा ट्वविस्ट

मुंबई | अमरावतीतील (Amravati) लव्ह जिहाद नवा प्रकारणात आता नवा ट्वविस्ट आला आहे. कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळूनच मुलगी घर सोडून गेलेली आहे, अशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी एका वृत्त वाहिनीला दिली आहे. 19 वर्षीय हिंदू तरुणीचे अपहरण करून बळजबरीने आंतरधर्मीय विवाह केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी काल (7 सप्टेंबर) केला आहे. यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत तरुणंचा शोधण्यात यश आले.  यावेळी राणांनी पोलीस उपायुक्त विक्रम साळींना दोन तासांत मुलीला शोधण्याचे अल्टीमेटम दिला होता.

 

दरम्यान, या प्रकरणात अपहरण केलेल्या मुलीने केलेल्या चॅटिंगवरून पोलिसांनी सोहेल शहा एका संशयित आरोपीला पकडले आहे. परंतु, पोलिसांना अपहरण केलेल्या 19 वर्षीय हिंदू तरुणी सापडली नाही. यामुळे राणांनी पोलिसांविरोधात  आक्रमक पवित्रा घेत आहे. यावेळी पोलीस आणि राणा यांच्यात काल खडाजंगी पाहायाल मिळाली.

अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह नेमक्या काय म्हणाल्या

अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “मुलगी सुखरुप आहे. त्या मुलीचे काल लोकेशन मिळाले. यानंतर आम्ही तात्काळ पुणे जीआरपी आणि सातारा पोलिसांना अर्लट केले. आम्हाला किंवा सातारा पोलिसांना माहिती नव्हते की, मुलगी कोणत्या ट्रेन आणि कोणत्या बोगीमध्ये आहे. यानंतर आम्ही सर्व ट्रेन चेक करण्यास सांगितले. आम्ही सातारा पोलिसांना पाठविलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी मुलीला शोधण्यात यश आले. मुलगी रागाच्या भरात ती घरातून निघून गेली होती. आणि ती एकटी निघून गेली होती, अशी माहिती त्या मुलींने सातारा पोलिसांना दिली आहे. ती मुलगी आज अमरावतीमध्ये आल्यानंतर पुढील माहिती कळेल.”  नवनीत राणांच्या लव्ह जिहादचा आरोप केला होता, पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “जेव्हापासून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून ते काही ना काही आरोप करत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपा कोणतेही तथ्य आढळलेले नाही.

 

नवनीत राणांनी पोलिसांवर काय आरोप केले

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या राणांनी राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना कॉल केला असता तो कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. यावरून राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्यावर नवनीत राणा चांगल्याच खडाजंगी झाली. “मी मागासवर्गीय असल्याने माझा कॉल रेकॉर्ड केला,” असा आरोप राणां केला असून पोलीस ठाण्यातील मनीष ठाकरे यांचा फोन हिसकावून घेतला.

संबंधिता बातम्या

अखेर अमरावतीतील ‘ती’ तरुणी साताऱ्यात सापडली; पोलीस आज घरी आणणार

तरुणीच्या अपहरणावरून नवनीत राणांचे पोलिसांसोबत खडाजंगी

Exit mobile version