HW News Marathi
क्राइम

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उद्या होणार निवृत्त

मुंबई | मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हे उद्या निवृत्त होणार आहेत. संजय पांडे यांच्या जागी आता विवेक फणसाळकर हे आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे. संजय पांडे हे उद्या (30 जून) सेवा निवृत्त होणार असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होण्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदभार सांभाळला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त पदभार संभाळल्यानंतर संजय पांडेवर अनेक आरोप झाले. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना हनुमान चालिसा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असताना वाईट वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. राणा दाम्पत्यांनी यासंदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांच्याकडे तक्रार केली होती.  यानंतर संजय पांडेंनी राणा दाम्पत्यांचा पोलीस ठाण्यात चहा पितानाचा सीसीटीव्ही फुटेज ट्वीट करत मुंबई पोलिसांवर केलेल सर्व आरोप फेटाळून लावले.

 पोलीस सेवेतील संजय पांडे कारकीर्द

  • आयआयटी कानपूरमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण
  •  1986 च्या बॅचमधील IPS अधिकारी
  •  सर्वात आधी पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहरात कामाला सुरुवात
  •  मुंबईतील डीसीपी रँकचे अधिकारी बनले
  •  1992 मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना
  • 1992-93 दंगलीच्या वेळी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख श्री कृष्णा आयोगाच्या अहवालात आहेमुंबईत चार हायप्रोफाईल पोलीस स्टेशन मिळून झोन 8 बनवलं, याचे पहिले डीसीपी संजय पांडे बनले. जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला
  • 1993 मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या दादागिरीला लगाम लावला.
  • 1995 मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला1997 इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करुन भ्रष्टाचाराचा उलगडा केला.
  •  1998 मध्ये पुढील शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात गेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
  • 1999 मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात होते
  • 2001 मध्ये राजीनामा दिला, परंतु तो मंजूर केला नाही, प्रकरण कोर्टात गेलं.
  • 2005 मध्ये सेवेत पुन्हा आले आणि कारकीर्दीतील 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक्त केली, पण ती पूर्ण झाली नाही.
  •  कोर्टातील लढ्यानंतर 2011 मध्ये पुन्हे सेवेत रुजू झाले.
  •  2014-15 लीगल मॅट्रोलॉजी डिपार्टमेंट कंट्रोलर मेजरमध्ये असताना बिल्डरांकडून फ्लॅट्सच्या कार्पेट एरियातील चोरी उघड केली. लोढा बिल्डरवर कारवाईही केली.
  •  2015 मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले आणि याच पदावर राहून महासंचालकही झाले.
  •  अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांना नियुक्ती दिली. तर संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवलं.
  • 9 एप्रिल रोजी संजय पांडे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.
  • संजय पांडे यांच्या निवृत्तीपूर्वी ते मुंबई पोलीस आयुक्ताचा पदभार संभाळला
संबंधित बातम्या
जाणून घ्या…कोण आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धार्मिक सणाला गालबोट लावणाऱ्याची गय केली जाणार नाही -पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील

News Desk

प्रेमाला नकार देणाऱ्या इंजिनिअर मुलीची जीवंत जाळून हत्या

News Desk

मुखेडमध्ये अवैध धंद्यावर छापे १२ लाखांचा ऐवज जप्त

News Desk