Site icon HW News Marathi

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उद्या होणार निवृत्त

मुंबई | मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हे उद्या निवृत्त होणार आहेत. संजय पांडे यांच्या जागी आता विवेक फणसाळकर हे आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे. संजय पांडे हे उद्या (30 जून) सेवा निवृत्त होणार असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होण्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदभार सांभाळला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त पदभार संभाळल्यानंतर संजय पांडेवर अनेक आरोप झाले. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना हनुमान चालिसा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असताना वाईट वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. राणा दाम्पत्यांनी यासंदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांच्याकडे तक्रार केली होती.  यानंतर संजय पांडेंनी राणा दाम्पत्यांचा पोलीस ठाण्यात चहा पितानाचा सीसीटीव्ही फुटेज ट्वीट करत मुंबई पोलिसांवर केलेल सर्व आरोप फेटाळून लावले.

 पोलीस सेवेतील संजय पांडे कारकीर्द

संबंधित बातम्या
जाणून घ्या…कोण आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे
Exit mobile version