Site icon HW News Marathi

इक्बाल मिर्चीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर ED ची कारवाई

मुंबई | इक्बाल मिर्चीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या ईडीने कारवाई केली आहे. पटेल यांचे मुंबईतील वरळी भागातील घरावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. वरळीतील ही जागा ही जागा बिल्डींग DHFL कडून डेव्हलप करण्यात आले होते. यात मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची यांनी प्लॅट खरेदी केला होता. यानंतर डेव्हलपरने हा प्लॅट डेव्हलप केल्यानंतर यातले काही फ्लॅट पटेल यांना विकले. या व्यवहारात मनी लाँड्रीग करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची ईडीने चौकशी करत असताना माहिती मिळाल्यानंतर पटेल यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

दरम्यान, वरळीतील सीजे हाउस ही एक मालमत्ता आहे. या इमारतीतील पटेल यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईनुसार, पटेल आणि त्यांचे कुटुंबिय या घरात राहू शकतात. परंतु, पटेल यांना हे घर विकू शकत नाही. पटेलांना त्यांचे घर विकण्याआधी ईडीची परवानगी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती माध्यमातून मिळाली आहे. ईडीच्या पटेल यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादीकडे ईडीने आपला मोर्चा वळवल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

संबंधित बातम्या

 

 

 

 

Exit mobile version