Site icon HW News Marathi

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पुन्हा एकदा फोनवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जीवे मारण्याची धमकीचा फोन आला. एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या अज्ञात व्यक्तींनी फोनवरून शरद पवारांना मुंबत येऊन देशी बंदुकीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती एबीपी माझाने दिली आहे.

 

शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानातील पोलीस फोन ऑपरेटर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गावदेवी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात 294 आणि 506 (2) आयपीसी कलमार्गत गुन्हा दाखल केलेला आहे. शरद पवार यांचा समोवारी (12 डिसेंबर) वाढदिवस झाला. शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Exit mobile version