HW News Marathi
क्राइम मुंबई

पासपोर्ट डिस्पॅच करण्याच्या नावाखाली अभिनेते धर्मेश व्यास यांची फसवणूक; ओशिवरा सायबर सेल पुन्हा अॅक्शन मोडवर

मुंबई – चित्रपट अभिनेता धर्मेश व्यास यांची 1 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. पासपोर्ट डिस्पॅच करण्याच्या नावाखाली ही फसवणूक झाली आहे. मात्र, धर्मेश यांनी वेळेत तक्रार केल्याने त्वरित फसवणूक झालेली सर्व रक्कम परत मिळवून देण्यात ओशिवरा पोलीसांच्या सायबर सेलला यश मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार धर्मेश जय किशोर व्यास यांना त्यांच्या मोबाईलवर एक फोन कॉल आला होता. तुमचा पासपोर्ट आला आहे. मात्र डिस्पॅच करण्यासाठी चा कोड ब्लॉक करण्यात आला आहे. तो अनब्लॉक करण्यासाठी पाच रुपये पाठवावे लागतील. यानंतर तुमचा पासपोर्ट दोन तासात तुमच्या घरी पोहोचेल असे समोरील व्यक्तीने फोनवर सांगितलं. मात्र, धर्मेश व्यास हे चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी समोरील व्यक्तीच्या नंबर वर पाच रुपये पाठवले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून एकूण 99,999/- रु वजा झाल्याचा मेसेज आला. व्यास यांनी तात्काळ त्यांच्या बँकेशी संपर्क करून त्यांच्या खात्यातून रक्कम वजा झाल्याचे सांगितले. तेव्हा बँकेने त्यांच्याबरोबर ऑनलाइन फ्रॉड झाल्याचे सांगितले.

धर्मेश व्यास यांची ऑनलाइन फसवणूक केल्याबाबतची तक्रार घेऊन ते समक्ष पोलीस (Police) ठाण्यात गेले. त्यानंतर त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन ओशिवरा पोलीस ठाणे येथे आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनावडे, वपोनि सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सायबर अधिकारी दिगंबर कुरकुटे, अशोक कोंडे, विक्रम सरनोबत यांनी तात्काळ प्राप्त माहितीच्या आधारे एचडीएफसी बँकेच्या मॅनेजरशी संपर्क साधला.

त्यांनंतर तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम ही IDFC Fast बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याने नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करुन व ईमेलद्वारे पत्र व्यवहार केले. त्यानंतर तात्काळ फिर्यादी यांची फसवणूक झालेली सर्व रक्कम 99,999/-रु. गोठविण्यात यश प्राप्त झाले. रक्कम व्यास यांना परत करण्याची बँकेमार्फत प्रक्रिया सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छगन भुजबळ यांना केईएम हॉस्पिटल मध्ये हलवणार

News Desk

मुंबईत १००० मुला-मुलींसाठी वसतीगृह सुरू करण्याची मागणी

swarit

पुणे जिल्ह्यातील नवीन विमानतळासाठी आवश्यक परवानग्यांचे काम सहा महिन्यात पूर्ण करणार- मदन येरावार

News Desk