HW News Marathi
क्राइम

25 हजारांची लाच घेताना कोतवाल व तलाठी अडकले एसीबीच्या जाळ्यात

उस्मानाबाद | शेतीचा फेरफार मंजूर करुन घेण्यासाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी २५ हजार रुपये घेताना लोहारा तालुक्यातील अचलेर येथील लाचखोर तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सोमवार, दि. २३ मे रोजी एसबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली आधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांनी सन २००५ मध्ये घेतलेल्या शेतीचा फेर फार वरिष्ठांकडून मंजूर करून देण्यासाठी यापूर्वी १० हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारल्याचे मान्य करून तसेच आज रोजी सदर कामासाठीच वरिष्ठांकडून फेरफार मंजूर करून देण्यासाठी आणि ऑनलाईन नमुना नंबर ९ ची नोटीस काढण्यासाठी तक्रारदारास अचलेर येथील आरोपी लोकसेवक तलाठी युवराज नामदेव पवार(३६) व कोतवाल प्रभाकर रुपनर (३७) यांनी सोमवारी ३० हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी २५ हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारले. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

सदरील सापळा लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे,अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक हुलगे, पोअ/ इफ्तेकर शेख, सिध्देश्वर तावसकर, विष्णु बेळे, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे

Related posts

“कोणाला लग्नाचे दाखले, जातीचे दाखले, जन्माचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा”

News Desk

वाशिम येथे दलित महिलेची हत्या

News Desk

चोरट्यांनी दरोड्याचं सोनं गहाण ठेवून विकत घेतला फ्लॅट

News Desk