HW News Marathi
क्राइम

पोलिस जवानांवर गोळीबार, एक जवान जखमी

गडचिरोली जिल्ह्यातील कोडगुल येथे पोलिस मदत केंदावर कर्यरत असलेले दोन जवान मोटरसायकलवर जात असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये आशिष मडावी जखमी झाला असून उपचारासाठी कोरची येथील रूग्णालयात दाखल केले.

आशिष मडावी आणि मनित हारामी हे दोन जवान मोटरसायकलवर केरची येथे जात असना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात मडावी जखमी झाला. ही माहिती पोलिस अधीक्षक देशमुख यांना मिळताच पोलिस अधीक्षक यांनी मडावी यांच्या उपचारासाठी हेलीकॉप्टर रवाना केले. मडावी यांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार करुन त्यांना हेलीकॉप्टरने नागपुरला नेण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेत्री अंजली श्रीवास्तवची आत्महत्या

News Desk

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीनेवर बलात्कार

News Desk

काबूल स्फोटांमध्ये 90 ठार, 150 जखमी; बायडन म्हणाले…

News Desk