Site icon HW News Marathi

सासरच्यांनी जादुटोणासाठी सुनेचे मासिक पाळीतील रक्त विक्रीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई | पुण्यात (Pune) एका महिलेसोबत तिच्या सासरच्यांनी अत्यंत घृणास्पद कृत्य केले आहे. महिलेला मासिक पाळीतील रक्ताची जादूटोण्यासाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचे दखल पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कडव्या शब्दात निंदा केली आहे. या प्रकरणातील आरोपींवर आरोपींवर जेवढी कडक कलमे लावता येतील. तेवढी कडक कलमे लावा, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांना आज (10 मार्च) विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “पुणे जिल्ह्यामध्ये सासरच्या लोकांनी एका महिलेला मासिक पाळीच्या वेळेला हात पाय बांधून अत्यंत विचित्र प्रकार केला. ते सार्वजनिकपणे बोलावेही वाटत नाही. विज्ञान युग असताना समाजात भयंकर अंधश्रद्धा वाढत चालली आहे. या अंधश्रद्धामध्ये अशा प्रकारच्या भीषण गोष्टी घडत आहेत. या प्रकरणी मी प्रथम पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो. ही घटना पुणे ग्रामीणमध्ये असल्याचे लक्षात आले. यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांशी बोललो. या आरोपींवर जेवढी कडक कलमे लावता येतील. तेवढी कडक कलमे लावा. कारण अशा प्रकारच्या घटना करताना कायद्याची भीत वाटत नाही. ती कायद्याची भीती वाटली पाहिजे. त्यामुळे दिवसभरात बऱ्याच गोष्टी घडतील.”

 

नेमके काय आहे प्रकरण

पुण्यात एका महिलेचे मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात 27 वर्षीय महिलेने पती, सासू, सासरे, दीर, मावस दीर आणि भाचा यांच्या विरुद्धात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी  महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचे 2 वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. यानंतर महिलेचा मानसिक छळ करण्यास सुरुवात झाली. सासरच्या मंडळींनी अघोरी विद्येच्या नादात पीडित महिलेच्या मासिक पाळीदरम्यान तिचे हातपाय बांधून तिचे मासिक पाळीचे रक्त 50 हजार रुपयांना जादूटोण्यासाठी विकल्याचा घृणास्पद होत होता. ही घटना पीडित महिलेने तिच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर तिने पोलिसात धाव घेत सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला.

 

 

 

Exit mobile version