Site icon HW News Marathi

आनंद तेलतुंबडे यांना शहरी नक्षलवाद प्रकरणी जामीन मंजूर

मुंबई | भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. तेलतुंबडेंना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Cour) आव्हान केल्यानंतर न्यायालयाने तेलतुंबडेंच्या जामीनाला आठवड्याभरासाठी स्थगिती दिली होती. तेलतुंबडेंच्या जामीन अर्जावरील याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत कार्यक्रमात तेलतुंबडे उपस्थित नव्हते. आणि तेलतुंबडेंनी कोणतेही भडकाऊ किंवा चिथावणीखोर भाषण देण्याचा काही संबंध नाही, असा दावा त्यांनी याचिकेत म्हटले होते.  तेलतुंबडेंना शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी ते तळोजा कारागृहात आहेत. तेलतुंबडेंना 2020 मध्ये शहरी नक्षलवादाच्या आरोप करत अटक केली होती. तेलतुंबडेंनी विशेष न्यायालयाने जामीन नकारल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

 

 

 

 

Exit mobile version