Site icon HW News Marathi

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातन संस्थाच…

मुंबई | ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ ला बंगळूरु येथे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मुख्य मुख्य आरोपी असलेला नवीन कुमार हा २०१७ सालापासून सनातनचा सक्रिय कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. हिंदू धर्माविरुद्ध बोलण्याच्या रागातूनच गौरी लंकेश यांची हत्या केल्याचा खुलासा त्याची पत्नी रूपा हिने केला आहे. हिंदू देव-देवतांवर टिप्पणी केल्याच्या संतापातून के.टी नवीन कुमार याने गौरी लंकेश ह्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. विशेष चौकशी समितीने त्याच्याविरुद्ध बंगळूरु येथे ६५१ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

शिवमोग्गाउत्सवाच्या वेळी नवीन कुमार याने त्याच्या पत्नीस सनातन धर्मसंस्थेच्या काही लोकांची ओळख करून दिली होती. यावेळी नवीन कुमार याला एक पिस्तूल, बुलेट्स देण्यात आल्या होत्या. दसरा सणाच्याआधी पत्नीने विचारणा केली असता त्या खोट्या बुलेट्स असून दसऱ्याच्यावेळी माकडे हुसकविण्यासाठी घेतल्या असल्याचे त्याने पत्नी रुपा हिला सांगितले. के.टी. नवीन कुमार याची पत्नी रूपा हिने ही माहीती विशेष चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे स्थानिक वृतपत्राने प्रसिद्ध केले आहे.

एका फॉरेन्सिक अहवालानुसार मद्दूरा येथे १० डिसेंबर २०१७ रोजी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत आरोपी के.टी. नवीन कुमार देखील सहभागी होता हे तपासात समोर आले आहे.

Exit mobile version