HW News Marathi
क्राइम

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई | पत्राचाळा घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेने नेते संजय राऊत  (Sanjay Raut) यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राऊतांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी पुन्हा एकदा वाढवली आहे.  यामुळे आता राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला असून राऊत हे सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. राऊतांना आज (22 ऑगस्ट) पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते.

 

दरम्यान, न्यायालायने दोन वेळा राऊतांचा जामीन अर्ज नाकारत न्यायालयीन कोठडी सुनावली. राऊतांच्या भांडूप येथील निवासस्थानी 31 जुलै रोजी सकाळी ईडीन छापा टाकला. यानंतर राऊतांनी 9 तासांची चौकशी केल्यानंतर ईडी त्यांना ताब्यात केली. यानंतर ईडी कार्यालयात देखील राऊतांची 7 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली. राऊतांना केल्यानंतर  न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत न्यालयीन कोठडी सुनावली. यानंतर राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राऊतांची न्यायालयीन कोठडी 8 ऑगस्टला न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने पुन्हा एकाद 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर राऊतांना आज न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा एकदा 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

 

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपणार; काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिस बंदोबस्तात अॅड. निकम यांचे मोबाईल चोरीला

News Desk

नितीन गडकरींना दाऊदच्या नावाने जिवे मारण्याची धमकी; कार्यालय आणि निवावसस्थानी सुरक्षेत वाढ

Aprna

नफा कमावून देण्याचे अमिष दाखवून दोन कोटींना गंडा

News Desk