Site icon HW News Marathi

“जर पोलिसांनी मला मदत केली असती तर…”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचा गंभीर आरोप

मुंबई | “वसई पोलिसांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्यांची चौकशी व्हावी. जर पोलिसांनी मला मदत केली असती तर माझी मुलगी जिवंत असती. किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती”, असा आरोप श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर (Vikas Walker) यांनी पोलिसांवर केला आहे. श्रद्धाची हत्या (Shraddha Murder Case)करणारा आफताब पूनावाला याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी आज (9 डिसेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.

श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणाले, “दिल्ली गव्हर्नर यांनी न्याय मिळवून देण्याचे मला आश्वासन दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. श्रद्धाची झालेली हत्या आम्ही कधीच विसरू शकत नाही. आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल दिल्ली पोलीस आणि वसई पोलिसांचे काम संयुक्तपणे सुरू आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी वसई येथील तुळीज पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्यांची चौकशी व्हावी. जर पोलिसांनी मला मदत केली असती तर माझी मुलगी जिवंत असती. किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती”, असे त्यांनी म्हटले आहे.

“अफताब पूनावाला यांने माझ्या मुलीची अत्यंत क्रूरतेने हत्या केली. यामुळे अफताबला कठोर शिक्षा व्हावी. आणि अफताबच्या आई-वडील आणि भावाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. अफताबला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे. या कटात जे कोणई सामील असतील त्याची देखील चौकशी करून त्यांनाही शिक्षा करावी,” अशी मागणी श्रद्धाच्या वडिलींनी केली आहे.

 

Exit mobile version