HW News Marathi
क्राइम

…मग मला घाबरण्याचे कारण काय ?

मुंबई | मुंबईतील घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या निर्घृण प्रकरणात हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री देबोलिना भट्टाचर्जीचा देखील हात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. याप्रकरणी देबोलिनाला पोलिसांनी चौकशीसाठी देखील बोलावले होते. “माझी काही चूक नाही मग मला घाबरण्याचे कारण काय ?”, असे देबोलिनाने म्हटले आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी काहीच दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सहाय्यक सचिन पवारला अटक करण्यात आली आहे.

“मी आणि सचिन पवार चांगले मित्र असून आमच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा या केवळ अफवा आहेत. आमच्या दोघांची ओळख एका प्रचार रॅलीदरम्यान झाली असून त्यानंतर आम्ही काही डॉक्युमेंट्रीजवर काम करीत होतो. त्याचप्रमाणे राजेश्वर उदानी आणि माझी फक्त तीन वेळच भेट झाली होती.सचिन पवारच्या अटकेने मला मोठा धक्का बसला. “, असे देबोलिनाने यावेळी सांगितले आहे. दरम्यान, सचिन पवार आणि देबोलिनाचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चेमुळे पोलिसांनी डेबोलीनला चौकशीसाठी बोलावले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आठ वर्षाच्या मुलाला सोडून आई पळाली

News Desk

“गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं”-छगन भुजबळ

News Desk

श्रध्दा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी करणार; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Aprna