HW News Marathi
क्राइम राजकारण व्हिडीओ

संजय राऊतांना AK47 ने उडविण्याची लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी

मुंबई |  पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्या गँगने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना  AK47 ने उडवून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी आज (1 एप्रिल) माध्यमांशी बोलताना केला आहे. या प्रकरणावरून संजय राऊतांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे.  या प्रकरणी पुण्यातून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊतांना मोबाईलवर धमकीचा मेसेज आला होता. या प्रकरणी पोलिसांनी संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी आले असून सामनाच्या ऑफिसमध्ये देखील गेले आहेत.

संजय राऊत म्हणाले, “मी कोणाशी बोललो नाही. मी त्यात फार लक्ष घातले नाही. माझे कर्तृव्य आहे, उद्या विचारतील तुम्ही आम्हाला कळविले नाही. म्हणून मी कळवायचे काम केले. पोलिसांनी अटक केली असेल तर पोलिसांचे आभार.” लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेण्यात आल्याचे पत्रकारांनी संजय राऊतांना विचारल्यावर ते म्हणाले, “होय, असेल आलेले आहे. परंतु, मी हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ती माहिती कळविली आहे. खासदार, लोकप्रतिनिधी, नागरिक म्हणून निदान पोलिसांना कळवावे, असे मला वाटले. कारण कळून सरकारला काही फायदा नाही. गेड्याच्या कातडीसे सरकार आहे. ते विरोधकांना एकतर ते तुरुंगात टाकायला तयार आहेत किंवा त्यांना मारण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ शकते, असे आता मला वाटायला लागले आहे.” संजय राऊत पुढे म्हणाले, “मी जे विधान फार गांभीर्याने आणि काळजीपूर्वक केलेले आहे. या राज्यात राज्य सरकार प्रायोजक गुंडगिरी दहशतवाद आणि दंगली सुरू आहे, असे मी स्पष्ट सांगतो.”

या प्रकरण्यात पुण्यातून  राहुल तळेकर ( वय साधारण 23) या तरुणाला अटक शुक्रवारी रात्री अट कले आहे. राहुल तळेकरला पुण्यातील खराडी भागातून अटक केले आहे. तर पुणे आणि मुंबई पोलीस यांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे सरकारमध्ये शपथ घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा संक्षिप्त परिचय

Aprna

#LokSabhaElections2019 : नीरव मोदीला अटक झाली यात तुमचे कसले यश ?

News Desk

शिवराजसिंह चौहान यांची दुतोंडी भूमिका ?

News Desk