Site icon HW News Marathi

“…कोठ्यावर नाचते”, संजय राऊतांची गंभीर आरोप

मुंबई | “कायदा व सुव्यवस्था कशी कोठ्यावर नाचते काही लोकांच्या ते तुम्हाला स्पष्ट दिसते”, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर केला आहे. बार्शीतील एका मुलीवर झालेल्या अत्याचाराचा फोटो संजय राऊतांनी त्यांच्या ट्वीटर केला होता.  या प्रकरणी संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आज (21 मार्च) माध्यमाशी बोलताना राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.

 

संजय राऊत म्हणाले, “मी कोणत्याही प्रकारे त्या मुलींचे नाव किंवा तिच्यावर झालेले इतर अत्याचाराविषयी काही बोललो नाही. फक्त माननीय मुख्यमंत्री या मुलीचे रक्त जे सांडलेले आहे. ते वाया जाऊ देऊ नका इतकेच म्हटले. यावर जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल. तर राज्यातील कायदा कोणत्या पद्धतीने काम करतोय. हे तुम्हाला स्पष्ट दिसेल. आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन केली जाती. एका व्हिडिओवरून एसआयटी स्थापन केली जाते. पण, मी एका रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या एका मुलीचे फोटो ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केले. म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो. एका खासदारावर, एका पत्रकारावर ही या राज्याची कायदा व सुव्यवस्था कशी कोठ्यावर नाचते काही लोकांच्या ते तुम्हाला स्पष्ट दिसते.”

मी ज्या माध्यमातून पोहोचवायला हवा…

 

बार्शींच्या प्रकरणात तुमच्यावर गुन्हा नोंदवील, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “मी काय चूकलो, फोटो ट्वीट केला. ज्या मुलीवर कोयत्याचे वार झालेले आहेत. त्या मुलेचे पालक माझ्याशी बोलले. त्या मुलीच्या आईने जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही. तर मला इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी ती सरकारकडे आक्रोशकरून करते. तिच्या आईने मरणाची इच्छा व्यक्त केली आहे. पारधी समाजातील ही मुलगी आहे. आणि बार्शीतील काही गुंड टोळ्यांनी तिच्यावर निर्घृण हल्ला केला. अजूनही काही मुख्य आरोपी बाहेर आहेत. अशी माझी भूमिका आहे. जर मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवायचा असेल मी दिल्लीस असताना. मी ज्या माध्यमांतून पोहोचवायला हवा होता. त्या माध्यमातून मी तो पोहोचविला.”

 

मी विधिमंडळाला कधीच चोर मंडळ म्हटले नाही

 

हक्कभंग समितीला आपण उत्तर दिलेले आहे, या प्रश्नावर राऊत म्हणाले, “मी हक्कभंग समितीला भूमिका मांडली. मला उत्तर द्याचे आहे. मी ऐवढेच म्हटले की, तुम्हाला माझ्यावर ज्या पद्धतीची हक्कभंग समिती आपण निर्माण केलेली आहे. त्यामध्ये मुळात तक्रारदारांना महत्व दिलेले आहे. मग, ते आता न्यायाधीश होतील. ज्यांनी तक्रार केलेली आहे. त्यांनाच न्यायाधीशांची भूमिका आहे. ज्या व्यक्तीवरती मी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या साखर कारखान्यासंदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप करतोय. आरोप म्हणण्यापेक्षा पुरावे देतोय. ते हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. राहुल कूल दौंडचा भीमा साखर कारखान्यात 500 कोटीचे मनी लाँड्रिंग झालेले आहे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. ती भूमिका आणि ते आंदोलन हे मी पुढे घेऊन जातोय. दौंडला माझी सभा सुद्धा आहे. ते अध्यक्ष आहेत. ज्या आमदारांवरती शिंदे गटाच्या फुटीर. अपात्रतेची टागती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयात ते तिथे सदस्य आहेत. त्या हक्कभंग समितीचे. हे सगळे ठरवून झालेले आहे. हे ठरवून झाल्यामुळे येथे न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे. मी माझे उत्तर दिलेले आहे. मी काय चोर माणूस मंडळ हे कधीच विधीमंडळाला म्हटलेले नाही. शिवसेनेतून जे फुटून गेलेले आहेत. चोर मार्गाने चोरून, लपून, भ्रष्टमार्गाने त्यांना मी चोर मंडळ म्हटले आहे. चोर मंडळ म्हणजे विधीमंडळ असून शकत नाही, अशी भूमिका मी मांडलेले आहे.”

Exit mobile version