Site icon HW News Marathi

राज ठाकरे यांचे ‘या’ प्रकरणातील अटक वॉरंट रद्द

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द झाले आहे. परळी न्यायालयाने (Parli Court) राज ठाकरेंचे अटक वॉरंट रद्द केले आहे. परळी न्यायालयाने 500 रुपयाचा दंड ठोठावत राज ठाकरेंची अटक वॉरंट रद्द केले आहे. राज ठाकरेंना परळी न्यायालयाने चिथावणीखोर वक्तव्या केल्या प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज (18 जानेवारी) परळीमध्ये दाखल झाले. राज ठाकरे परळीत दाखल झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

दरम्यान, यापूर्वी राज ठाकरेंना परळी न्यायालयाने 3 आणि 12 जानेवारीला परळीत हजर राहण्यास सांगितले होते. तसेच न्यायालयाने राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीमुळे 12 जानेवारी रोजी होणारी तारीख वाढवून दिली होती. यानंतर न्यायालयात आज न्यायालयात सुनावणी होती.  आणि यासाठी राज ठाकरे परळीत आले होते.

नेमके काय आहे प्रकरण

2008 साली राज ठाकरेंना मुंबईत एका प्रकरणात अटक झाली होती. आणि राज ठाकरेंच्या अटकेचे पडसात परळीमध्ये देखील त्यावेळी उमटले होते. परळीमधील धर्मापुरी पॉईट येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. यानंतर राज ठाकरेंनी चिथावणीखोर वक्तव्याबाबत आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर परळीत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी चार्जशीट फाईल केली होती. यानंतर राज ठाकरे हे तारखेला अनुपस्थित राहिल्यानंतर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. यापूर्वी राज ठाकरेंना परळी न्यायालयाने 3 आणि 12 जानेवारीला परळीत हजर राहण्यास सांगितले होते. तसेच न्यायालयाने राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीमुळे 12 जानेवारी रोजी होणारी तारीख वाढवून दिली होती. यानंतर न्यायालयात आज न्यायालयात सुनावणी होती.  आणि यासाठी राज ठाकरे परळीत आले होते.

 

Exit mobile version