Site icon HW News Marathi

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई | पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात राऊतांच्या जामीन अर्जावर आज (9 नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे. यापूर्वी राऊतांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालयात लेखी स्वरुपात उत्तर दिले आहे. यावर न्यायालयाने आज होणाऱ्या सुनावणी राऊतांच्या जामीन अर्जावर ही अंतिम फैसला देणार आहे. यामुळे राऊतांना आज जामीन मिळणार की पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावणी याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

ईडीने राऊतांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी 31 जुलै रोजी सकाळी ईडीन छापा टाकला. यानंतर राऊतांनी 9 तासांची चौकशी केल्यानंतर ईडी त्यांना ताब्यात केली. यानंतर ईडी कार्यालयात देखील राऊतांची 7 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली. यानंतर राऊतांना पीएमएलए न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर राऊतांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले. यानंतर गेल्या तीन महिन्यापासून राऊत हे तुरुंगात आहे. या तीन महिन्यात अनेक वेळा राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. परंतु, नेहमी राऊतांच्या न्यायालयीन कोठीड वाढ करण्यात आली.

 

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला होणार सुनावणी

 

Exit mobile version