Site icon HW News Marathi

न्यायालयाने ‘या’ कारणामुळे कुख्यात डॉन अरुण गवळीला दिला पॅरोल

मुंबई | कुख्यात डॉन अरुण गवळीला (Arun Gawli) पॅरोल मंजूर झाला आहे. गवळी हे खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. परंतु, मुलाच्या विवाहासाठी गवळीला पॅरोल मंजूर झाला आहे. गवळीच्या मुलांचा विवाह सोहळा 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गवळींनी कारागृह प्रशासनाकडे पॅरोलसाठी अर्ज केला होता. यानंतर कारगृह प्रशासनाे गवळींचा पॅरोल मंजूर केला होता. परंतु, यावेळी कारागृह प्रशासनाने पोलीस सुरक्षा व्यतिरिक्त गवळींनी नियोजित स्थळी जावावे, अशी अट घालण्यात आली होती.

कारागृह प्रशासनाच्या अटीविरोधात गवळींनी  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे पॅरोलसाठी याचिका दाखल केला होता. या याचिके गवळींनी पोलीस सुरक्षाविना आठ दिवसांचा पॅरोल मिळावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाच्या याचिके केली होती.  यानंतर न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर चार दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

गवळींनी 2 मार्च 2007 रोजी मुंबईतील असल्फा भागातील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या घरात घुसून गोळीबार करत हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी 2008 मध्ये गुळींला अटक केली होती. यानंतर 2012 मध्ये गवळींला विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणी गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत

 

 

 

 

 

 

Exit mobile version