Site icon HW News Marathi

उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब; फेक कॉल करणारा पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) सोमवारी रात्री दोन वाजताच्या सुमारात हा उपमुख्यमत्र्यांच्या निवासस्थानासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता. यानंतर नागरपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी तपास केल्यानंतर हा फोन फेक असल्याचे समोर आले. नागपूर पोलिसांनी अधिक तपास करत धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्ती कन्हान परिसरात राहत असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी धमकीचा फोन केलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, नागपूर पोलिसांना बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना बाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. उमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर फोन ठेवल्याचा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यावर पुढील करावई सुरू असल्याची माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

 

 

Exit mobile version