Site icon HW News Marathi

केतकीप्रकरणी पोलिसांनी रद्द केलेले कलम का लावले?, राष्ट्रीय महिला आयोगाने अहवाल मागवला

मुंबई | अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले कमल का लावले?, असा सवाल राष्ट्रीय महिला आयोगाने विचारला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस स्टेशनमध्ये केतकीवर  माहिती तंत्रज्ञान कलम 66 (अ) गुन्हा दाखल केला होता. आणि सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला कमल का लावला?,  असा सवाल उपस्थित करत राष्ट्रीय महिला आयोगाने विचार मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढल्यानंतर अहवाल मागवला आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यानंतर पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले असून सध्या केतकी तुरुंगात आहे. या प्रकरणी केतकीविरोधात ठाण्याच्या कळ्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी गुन्हा दाखल केला होता. कळव्यात केतकीविरोधात पोलीस ठाण्यात कलम ५००, ५०५ (२), ५०१, आणि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. केतकीवर रद्द केलेले कलम लावल्याचे कळाल्यानंतर  राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला आहेत. या प्रकरणी पोलिसांवर कोणते कारवाई करण्यात येईल.

केतकीला अ‍ॅट्रोसिटी प्रकरणी मिळाला जामीन

केतकीला ठाणे न्यायालयाने अ‍ॅट्रोसिटी प्रकरणी गुरुवारी (16 जून) जामीन मंजूर केला. केतकीला अ‍ॅट्रोसिटीचा गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. केतकीला 25 हजाराच्या जातमुचलक्यावर न्यायालायने जामीन मंजूर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जामीनासाठी धडपड करत होती. केतकीने केतकीला जामीन मिळाला तरी देखील ती तुरुंगातच राहणार आहे. केतकीचे वकील योगेश देशपांडेंनी अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्यात आलेले कलम योग्य नसल्याचे युक्तीवाद त्यांच्या वकिलांनी केला आहे.

संबंधित बातम्या
केतकी चितळेला ‘या’ प्रकरणी मिळाला जामीन

 

Exit mobile version