Site icon HW News Marathi

कथित 19 बंगला घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अडचणीत पुन्हा वाढ

मुंबई | कथिक 19 बंगल्यांच्या घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. या प्रकरणी ग्रामविकास आधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतीविरोधात रेवदंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. यात कोलई ग्रामपंचयतीचे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, “उद्धव ठाकरे परिवाराचा कोर्लई अलीबाग येथील 19 बंगले घोटाळासंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये 19 बंगल्याच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ यानुसार गुन्हा दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांना 19 बंगल्याचा हिशेब द्यावाच लागणार”, अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

कोलई येथे 9 एकर जागा उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्रे वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचे नावने खरेदी केली आहे. आर्किटेक्ट कै अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली ही जमीन खरेदी केली आहे. या जागेवर 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी वारंवार करत होते. यासंदर्भात किरीट सोमय्यांनी कोर्लई कोर्लई ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय पाठपुरावा केला होता. यानंतर अखेर गुरुवारी कथित 19 बंगल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

Exit mobile version