Site icon HW News Marathi

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटकपूर्व जामीन मंजूर मिळाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Sessions Court) भाजप महिला पदाधिकारी रीदा रशीद  विनयभंगप्रकरणी आव्हाडांना जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने आव्हाडांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. रीदा रशीद यांनी आव्हाडांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आव्हाडांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (15 नोव्हेंबर) सुनावणी पार पडली.

पोलीसांनी आव्हाडांवर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा असतो. आव्हाडांनी अटकेची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अंतरिम आदेश देसाना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले. न्यायालयाने आता आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे आव्हाडांना विनयभंगप्रकरणात दिलासा मिळाला आहे.

 

न्यायालयात नेमके काय झाले

 

आव्हाडांचे वकील गजानन चव्हाण यांनी युक्तिवाद सादर केला. आव्हाडांच्या वकीलांनी चव्हाणांनी न्यायालयात युक्तीवाद मांडताना म्हणाले, “घटनास्थळी मोठी गर्दी  होती. या गर्दीच्या ठिकाणी विनयभंग कसा होऊ शकतो?,” असे त्यांच्या वकीलांनी न्यायालयात मांडले. तसेच तक्रारदार महिलेला आव्हाडांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या कार्यक्रमात बहिण असा उल्लेख केला होता. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आव्हाडांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केला आहे.

 

नेमके काय आहे प्रकरण
ठाण्यातील कळवा खाडी पुलाचे रविवारी (13 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थितीत होते. या सोहळ्यादरम्यान भाजपच्या महिला पदाधिकारी मुख्यमंत्री गाडीतून जात असताना गाडीच्या डाव्या बाजूला पुढे उभी होतो. त्यावेळी आव्हाड गाडीच्या समोरुन आले असून त्या भाजपच्या महिला पदाधिकारीला आव्हाडांनी हात लावून बाजूला केले गेले. यानंतर महिलेने आव्हाडांनी चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप करत मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात तक्रारदाखल केली. या महिलेच्या तक्रारीच्या आधारे आव्हाडांवर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

जितेंद्र आव्हाडांच्या जामीन अर्जावर लवकरच निकाल

Exit mobile version