Site icon HW News Marathi

साईबाबांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवलं! बागेश्वर बाबांविरोधात मुंबईत तक्रार दाखल

मुंबई | बागेश्वर बाबा उर्फ ​​धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Baba) यांच्या विरोधात मुंबईमधील वांद्रे पोलीस (Bandra Police) ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. बागेश्वर बाबांनी साईबाबांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून ठाकरे गटाचे ठाकरे गटाचे युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात ठाकरे गटाने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. बागेश्वर बाबाने साईबाबांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भक्तांच्या भावना दुखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बागेश्वर बाबांविरोधात ठाकरे गटाचे युवासेना नेते साई भक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. यानंतर वांद्रे पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बागेश्वर बाबांविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करत तक्रार दाखल करण्यात आली. बागेश्वर बाबांनी 25 मार्च ते 21 मार्चदरम्यान मध्य प्रदेशाच्या जबलपूरमध्ये करण्यात आले होते. तेव्हा गुरु शंकराचार्यांनी साईबाबांना कधीच देवाचा दर्जा दिला नसल्याचे म्हटले होते.

बागेश्वर बाबा नेमके काय म्हणाले

बागेश्वर बाबा उर्फ ​​धीरेंद्र शास्त्री यांनी शिर्डींच्या साई बाबांबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. बागेश्वर बाबा म्हणाले, “साईबाबा हे देव नाही. तर साई बाबा हे संत आणि फकीर असू शकतात. परंतु, देव अश शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठे स्थान असून त्यांनी साईबाबांना देवांचे स्थान दिलेले नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकत नाही.”

 

 

Exit mobile version