Site icon HW News Marathi

भाजपच्या नगरसेवकांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

मुंबई | सांगलीतील (Sangli) जतमध्ये एका नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने सांगलीसह महाराष्ट्रात एकच खळबळ माजली.  विजय ताड (Vijay Tad) असे  नगरसेवकाचे नाव असून हा भाजपचा (BJP) नगरसेवक आहे. विजय ताड यांच्यावर अल्फान्सो स्कूल जवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडला. त्यात विजय ताड यांचा जागीत मृत्यू झाला.

 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा हल्ला कोणी केला हे अद्याप समजून शकले नाही. विजय ताड यांच्या समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. या घटनेचे गांभीऱ्या ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली सुद्धा जतच्या दिशने रवाना झाले आहेत.

 

 

 

Exit mobile version