HW News Marathi
क्राइम

4 लाखाची लाच, पठ्ठ्याने साखरेचं पोतंही सोडलं नाही; ग्रामविकास अधिकारी रंगेहात फसला

शिवाजी मामनकर, बुलढाणा : सेवानिवृत्तीच्या मार्गाकडे वाटचाल सुरु झालेली असतांनाही मोताळा तालुक्यातील बोराखेडीचे ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार (वय 54) लाच घेण्याची हाव सुटली नाही. विवाह नोंदणीच्या वेळी जोडण्यात आलेली काही कागदपत्रे देण्यासाठी रामचंद्र पवार यांनी चक्क 4 लाख रुपये मागितले. एवढेच नव्हे तर या पठ्ठ्याने साखरेचे पोतही लाचेच्या स्वरूपात मागितले. पण लाच घेताना रंगेहात पकडला गेला.

तक्रारदार मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील असून तडजोडीअंती लाचेची रक्कम दोन लाख रुपयांवर आली. तक्रारदाराने सदर बाब अँटीकरप्शन ब्युरोमध्ये कळवली. मंगळवार, 31 जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान बुलढाणा येथील चिखली रोडवर नागरे ठेकेदार यांच्या बंगल्यासमोर गाळा क्रमांक आठमध्ये लाच देण्याचे ठरले. लाचखोर आरोपी रामचंद्र पवार नियोजित वेळेवर पोहोचले. त्या ठिकाणी तक्रारदाराने एक लाख रुपयांची रक्कम पवार यांना सुपूर्द केली. मात्र दबा धरून बसलेल्या अँटी करप्शनच्या पथकाने दुसऱ्याच क्षणाला लाचखोर ग्राम विकास अधिकारी पवार याच्यावर झडप घातली. पवारला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनात तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या सूचनेनुसार बुलढाणा उपाधीक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, एपीआय शाम भांगे, पो.हॅकॉ विलास साखरे, पो.ना. मोहम्मद रिजवान, प्रवीण बैरागी, जगदीश पवार, विनोद लोखंडे , सुनील राऊत, रवींद्र दळवी, म.पो.काॅ. स्वाती वाणी, ला.प्र.वि बुलढाणा यांनी यशस्वी केली. आरोपी ग्राम विकास अधिकारी रामचंद्र पवार याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक पेट्रोलपंपावरील महिलेकडील चार लाखांची लूट

News Desk

प्रमोशन मिळाले नाही मॅनेजरची आत्महत्या

News Desk

धार्मिक सणाला गालबोट लावणाऱ्याची गय केली जाणार नाही -पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील

News Desk