HW News Marathi
क्राइम

प्रेयसीच्या बदनामीसाठी सिद्धिविनायक मंदिर उडविण्याची धमकी देणाऱ्यास अटक

मुंबई | मुंबईतील प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ठाण्यातील विविआना मॉलच्या तळमजला आणि पहिल्या मजल्याच्या बाथरूममध्ये Gazva-E- Hind व ISIS यांच्या वतीने “दादर सिद्धिविनायक मंदिर Boom” असा संदेश देण्यात आला आहे. रविवारी (१६ जून) हा प्रकार उघड झाला. दहशतवादी संदेश विविआना मॉलच्या पॅम्फ्लेटवर स्केच पेनने “दादर सिद्धिविनायक मंदिर Boom” असा संदेश लिहिण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. केतन घोडके असे या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या बदनामीसाठी त्याने हे सर्व केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पॅम्फ्लेटवर स्केच पेनने त्या संदेशासह ९१३७८०४३८० व ९७६८४५०८५५ हे दोन मोबाईल नंबर लिहून विविआना मॉलच्या परिसरात व आजूबाजूच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या नंबरच्याआधारे कु. दिपाली कांतीलाल भानुशाली यांचा शोध घेऊन या प्रकरणी त्यांची विचारपूस करण्यात आली. यावेळी त्यांनी आपला पूर्वीचा प्रियकर केतन घोडके (विक्रोळी) याने त्यांची बदनामी व्हावी व पोलिसांकडून त्रास व्हावा यासाठी हा संपूर्ण प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांनी त्यानंतर विक्रोळी येथे आपली टीम पाठवून चेतन घोडके याला याप्रकरणी अटक केली आहे. तसेच चेतन घोडके याने देखील आपण वरील कृत्य केल्याची कबुली देखील दिली आहे. सादर बाबत वर्तक पोलीस ठाण्यात नॉन कॉग्नेझबल गुन्हा क्रमांक १२८१/ २०१९ कलम ५०५ आयपीसीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यामुळे विविआना मॉल आणि आजूबाजूच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे या प्रकरणी एटीएसला देखील कळविण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुस-या महिलेसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीवर हल्ला

News Desk

ट्रक व मॅजिक धडकेत २ ठार ४ जण गंभीर जखमी 

News Desk

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडून देणाऱ्यास NIA कडून 25 लाखांचे बक्षीस जाहीर

Aprna