HW News Marathi
मनोरंजन

नारळाच्या करंज्या

ख्रिश्चन समुदाय भारतात मोठ्या प्रमाणात नसला तरी भारतात नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व ख्रिश्चन बांधव आपली घरे सुशोभित करातात. या उत्सवासाठीची तयारी आठवडाभरपुर्वीपासुनच सुरु होते. उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मित्र परीवारात भेटींचे आयोजन केले जाते. उत्सव कुठलाही असू द्या तो विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांशिवाय अपुर्णच. चमचमीत असे, तर काही तोंड गोड करणारे असे मिष्टान्न असले की उत्सवाची रंगत काही औरच असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नाताळ उत्सवासाठी केल्या जाणाऱ्या अशाच काही खास पाककृती.

साहित्य

५०० ग्रॅम मैदा

६ ते ७ चमचे (टेबलस्पून) साजूक तूप

अर्धी वाटी किसलेले ताजे नारळ

अर्धी वाटी काजू

अर्धी वाटी लहान मनुका

अर्धी वाटी बादाम

अर्धा किलो साखर

अर्धा कप पाणी

अर्धा चमचा (टीस्पून) इलायची पावडर

तळणासाठी तेल किंवा तूप

कृती

1. एका भांड्यामध्ये मैदा घेउन त्यात थोडे साजूक तूप घाला नंतर त्यात आवशक्यतेनुसार पाणी घालून त्याचा नरम गोळा तयार करा. कणिक मळतो तसा गोळा तयार झाला की त्या गोळ्याला थोडावेळ एका कापडाने झाकून ठेवा.

2. किसलेला नारळ एका पॅनमध्ये मंद आचेवर ठेवून लालसर होइस्तोवर भाजून घ्या आणि थंड करायला बाजुला ठेवा.

3. दुसऱ्या एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून साखरेचा दोन तारी पाक करुन घ्या.

4. भाजलेल्या नारळमध्ये मनुका, काजू, बदाम आणि वेलची पावडर घालून गुजीयासाठी सारण तयार करुन घ्या.

5. आधिच भिजवुन ठेवलेल्या मैद्याच्या पात्या लाटुन त्यामध्ये वरिल सारण भरुन तुम्हाला हव्या तशा आकाराच्या गुजीया बनवुन घ्या.

6. एका पॅनमध्ये तेल किंवा तुप टाकुन गरम करण्यास ठेवा तेल चांगले तापले की त्यामध्ये तयार गुजीया तळून घ्या.

गरमागरम गुजीया तयार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिस इंडिया २०१८ स्पर्धेत मुंबईतील महिलेने मारली बाजी

News Desk

मराठी बिग बॉस होस्ट करण्याची इच्छा – शिल्पा शिंदे

swarit

आपल्या डोळ्यांची काळजी व्हॉट्सअॅप घेणार ?

News Desk