HW News Marathi
देश / विदेश

Republic Day | यंदा महाराष्ट्राच्या वतीने ‘छोडो भारत’ चळवळ दर्शविणारा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणार्‍या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘छोडो भारत’ या चित्ररथाची निवड करण्यात आली आहे. १९४२ च्या चळवळीची हाक देणारे मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानावरील ‘छोडो भारत’ चळवळीचे सादरीकरण या माध्यमातून देशपातळीवर होणार आहे.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे निमित्त साधून देशाच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणार्‍या संचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘छोडो भारत’ चळवळ दर्शविणारा चित्ररथ राजपथावर प्रदर्शित होणार आहे. देशभरातून २९ राज्यांनी राजपथावरील प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती. विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील १५ राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची महाराष्ट्राची दीर्घ परंपरा असून राज्याने आतापर्यंत सात वेळा प्रथम क्रमांक पटकवला आहे.

असा असणार चित्ररथ

चित्ररथाच्या पुढील भागात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दृढनिश्चय व करूणामयी स्वभाव दर्शविणारी मोठी प्रतिमा उभारण्यात येणार आहे. स्वदेशी वस्तूंचे प्रतीक असणारा चरखा आणि मुंबईची खास ओळख गेट वे ऑफ इंडियाच्या मोठ्या प्रतिमाही चित्ररथावर असणार आहेत. १९४२ मध्ये तत्कालीन गवालीया टँक अर्थात ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या छोडो भारत चळवळीची भव्यता दर्शविणारा जनसागर चित्ररथाच्या दोन्ही बाजूस विविध म्युरल्सच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे. छोडो भारत चळवळीचे महत्व पटवून देणार्‍या गीताची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर…

News Desk

नोट नव्हे तर २० रुपयांचे नाणे येणार चलनात

News Desk

भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

News Desk