HW News Marathi
राजकारण

गोव्यात नरकासुरांच्या पुतळ्याचे दहन करून नरक चतुर्दशी साजरा

पणजी | दीवाळीच्‍या औचित्‍याने गोव्यात नरक चतुर्दशीचा उत्साहा पाहायला मिळतो. गोव्यात नरकासुराच्या आक्राळ-विक्राळ प्रतिमा ठिकठिकाणी पाहायला मिळल्या होत्या. दक्षिण गोव्याच्या अनेक भागांमध्ये रात्री बाराच्या सुमारास मुख्य चौकातून नरकासूर पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच आजही (६ नोव्हेंबर) देखील नरकासुराचे पुतळे जाळण्यात आले आणि फटाके फोडून उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली.

गोव्यामध्ये नरकासुराच्या देखाव्यासाठी अनेक मंडळांमध्ये चढाओढ पाहायला मिळली आहे. नरकासुराची ४० फूट प्रतिमा तयार केली जाते. हा उत्‍सव पाहायला दूर-दूरवरून लोक येथे येतात. दिवाळीच्या पहाटे म्हणजेच मंगळवारी नरकासुराच्या प्रतिमांचे दहन करून गोव्यात दिवाळीचे स्वागत करण्यात आले. माणसातील वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा, असा या मागचा हेतू असतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर

News Desk

Sharad Pawar ED Case | पवारांसाठी बारामतीनंतर आज ‘परभणी बंद’

News Desk

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या ‘या’ तीन उमेदवारांमध्ये रस्सीखेच

Aprna