HW News Marathi
शिक्षण

स्कूलबस चालकाचा मुलगा सीएसच्या परीक्षेत अव्वल

उत्तम बाबळे
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे… अर्थात परिस्थिती कितीही कठीण असली तरी कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते, हे वाक्य अहमदाबादमधल्या २० वर्षीय तरूणाने खरं करून दाखवले. स्कूलबस चालकाच्या मुलाने बिकट परिस्थितीवर मात करून इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरीज आॅफ इंडियाच्या (सीएस) परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला.

मुस्तफा सिबात्रा (२०) असे त्या मुलाचे नाव असून त्याचे वडील मणिनगर येथील कुमकुम शाळेत बसचालक म्हणून काम करतात. त्याच शाळेत शिक्षण घेतलेल्या मुस्तफाने बिकट आर्थिक परिस्थितीची जाण ठेवून कठोर मेहनत करत हे घवघवीत यश मिळवले. ‘आई-वडिलांचा आशिर्वाद आणि कठोर मेहनतीच्या जोरावरच मी यशस्वी झालो’ अशा नम्र शब्दांत त्याने कौतुक स्वीकारले.

मुस्तफा सीएससोबतच सहजानंद कॉलेजमधून बीकॉमचे करत असून शिक्षणासाठी तो दररोज वाटवा ते आश्रम रोड असा लांबलचक प्रवास करतो. ‘इन्स्टिट्युटमध्ये पोहोचण्यासाठी मला दोन बसेस बदलून दोन तासांचा प्रवास करावा लागायचा. आणि तेवढेच अंतर परत कापून घरी जाऊन मी अभ्यास करायचो’ असे त्याने सांगितले. मात्र आयसीएसआयच्या अंतिम परीक्षेतही घवघवीत यश मिळवण्याचे त्याचे ध्येय असून त्यासाठी कितीही प्रवास, मेहनत करायची त्याची तयारी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामीण विकासात पदविका अभ्यासक्रम

News Desk

सीबीएसईचा २५ एप्रिलला बारावीचा पेपर फक्त दिल्ली आणि हरियाणात

News Desk

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी

News Desk