HW News Marathi
शिक्षण

आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नाण्यांचे १ दिवसीय अनोखे प्रदर्शन

मुंबई | प्राचीन भारताचा अभ्यास करताना अनेकदा नाण्यांचा संदर्भ घेतला जातो. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात नाण्यांवर आधारीत असलेला इतिहास समजावा यासाठी चेंबूरच्या नालंदा एज्यूकेशन सोसायटी संचलित डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात इतिहासाच्या सांची विभागाअंतर्गत एकदिवसीय नाणे व नोटांचे प्रदर्शन बुधवारी भरविण्यात आले होते.

यावेळी प्रदर्शनात १५० हून अधिक नाणी तर १०० हून अधिक नोटांचा समावेश असल्याचे पहायला मिळाले. इतिहास विभागाच्या प्रमुख वैशाली राजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. आरती भानावत, प्रा. श्रीकांत कुलकर्णी, प्रा. उज्वला म्हात्रे, प्रा. वैभवी अडसुळे यांनी हे प्रदर्शन भरविले होते. यावेळी प्रदर्शनाला महाविद्यालयाच्या मॅनेजमेंट कमिटीतील सदस्यांनी उपस्थिती दर्शवली तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर वर्गाचा तसेच विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याचे पहायला मिळाले.

यावेळी बोलताना इतिहासाच्या विभाग प्रमुख वैशाली राजे म्हणाल्या, नाणी हा इतिहासातील अमूल्य ठेवा आहे. कोणत्याही ऐतिहासीक कालखंडाचा अभ्यास करताना नाण्यांशिवाय इतर अस्सल पुरावा आपल्याला सापडत नाही. नाण्यांच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाचे चांगल्या प्रकारे आकलन होते. तात्कालीन अर्थव्यवस्थेची माहीती मिळते असेही त्या म्हणाल्या. सदर प्रदर्शनात नाण्यांविषयी विस्तृत माहिती इतिहासाचे प्राध्यापक श्रीकांत कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थांना दिली.

या नाण्यांचा होता प्रदर्शनात समावेश

नाण्यांच्या या अनोख्या प्रदर्शनात १५० नाण्यांसह १०० नोटांचा समावेश होता. यामध्ये विविध आकाराची, मजकूर असलेली, वेगवेगळ्या धातूंची आणि भारताचा इतिहास सांगणारी नाणी विद्यार्थ्यांनी अभ्यासली. प्रदर्शनात स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील नाणी ठेवण्यात आली होती. ब्रीटीश काळातील राजांनी बनवलेली नाणी, इस्ट इंडीया कंपनी, विक्टोरीया राणी,किंग जॉर्ज ५ वा, किंग जॉर्ज ६ वा, किंग एडवर्ड तसेच स्वातंत्र्यानंतर छापण्यात आलेली नाणी आदि नाण्यांचा या प्रदर्शनात समावेश पहायला मिळाला. नोटांमध्ये १ रुपयेच्या नोटांपासून २००० हजार रुपयांच्या नोटा, अर्धा पैशांपासून १० रुपयांच्या कॉइन पर्यंत चलनात असलेली नाणी यावेळी पहायला मिळाली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाषांतरामुळे ज्ञाननिर्मितीमध्ये भर पडते – डॉ. माया पंडित          

News Desk

अनुदान, बीजभांडवल योजनेचा बँकेमार्फत लाभ देण्यासाठी अर्ज करा

News Desk

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी १० जुलै पर्यंत अर्ज करू शकता

News Desk