HW News Marathi
शिक्षण

तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका नोकरी करा !

अमरावती |तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका नोकरी करा,” असे वादग्रस्त वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी (४ जानेवारी)आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना तावडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.

या कार्यक्रमाच्या वेळी आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना सरकार मोफत उच्च शिक्षण देणार का? असा प्रश्न एका पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने विचारला होता. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नवर “तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका नोकरी कर,” असे वक्तव्य तावडेंनी केले होते. पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांनी प्रश्नोत्तर मोबाईलमध्ये शूटिंग करत होते. ही बाब लक्षात येताच तावडे यांनी शूटिंग बंद करण्यास आणि झालेले चित्रीकरण डिलीट करण्यास सांगितले होते.

तसेच युवराज मनोहर दाभाडे या विद्यार्थ्याचे रेकॉर्डिंग सुरूच होते. त्याला पुन्हा रेकॉर्डींग बंद करण्यास सांगण्यात आले. तथापि हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत, असे बाणेदार उत्तर देत युवराजने शूटिंग सुरूच ठेवले. या प्रकारामुळे संतापलेल्या तावडे यांनी, ‘प्रायव्हसी हर्ट’ होत असल्यामुळे या विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश पोलिसांनी दिले होते. पोलिसांनी लगेच युवराजचा मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याला वाहनात डांबून घेऊन जाऊ लागले. विद्यार्थी वाहनामागे धावत गेले.

तावडेंच्या राजीनाम्यांची मागणी

पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रश्न विचारला आणि मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याच्या कारणावरून त्यांना थेट अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांची नावे युवराज दाभाडे आणि प्रशांत राठोड अशी आहेत. या दोघांचा मोबाइल जप्त करुन त्यांना अटक करण्याचा आदेश देणाऱ्या तावडेंनी मंत्री पदाची नैतिकता ठेवून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी एच. डब्ल्यू मराठीशी बोलताना केली आहे.

Related posts

सर्जनशील मोफत कार्यशाळा

News Desk

व्यवसाय परीक्षेचा अर्ज भरण्याबाबत नांदेड आयटीआयमध्ये प्रशिक्षण                                                                                

News Desk

कायद्याच्या अंमलबजावणीला घरातून सुरुवात करा

News Desk