Site icon HW News Marathi

पुणे विद्यापीठाकडून इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द

पुणे | पुणे विद्यापीठमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’चे अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी आवश्यक निधी आणि संशोधकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यास पुणे विद्यापीठ असमर्थ ठरले आहेत. ‘इंडियन हिस्ट्री कॉंग्रेस’चे अधिवेशन २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते. परंतु निधी उपलब्ध नाही आणि अधिवेशनालाठी पुण्यात येणाऱ्या इतिहास संशोधकांच्या राहण्याची व्यवस्था करणे अशक्य कारण देत हे अधिवेशन रद्द करण्यात आले आहे.

जवळपास ५५ वर्षांनंतर ही अधिवेशन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयोजित करण्यात येणार होती. या अधिवेशनात देशभरातून सुमारे ३ हजार इतिहास अभ्यासक उपस्थित राहणार होते. परंतु अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सदस्यांनी पुणे वि्दयापीठाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खेलो इंडिया या केंद्र सरकारच्या कार्यक्रमासाठी पुण्यातील सर्व गेस्ट हाऊस बुक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु खेलो इंडिया कार्यक्रम आणि इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन यातील तारखांमध्ये तफावत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्या काही काळात पुराणातल्या गोष्टी इतिहास म्हणून सादर करण्याला आणि त्याआधारे इतिहासाचे पुनर्लेखन करण्याला विरोध होत आहे. इंडियन हिस्ट्री काँग्रसने या गोष्टींना सातत्याने विरोध केला आहे. त्यामुळे राजकीय दबावामुळे हे अधिवेशन रद्द करण्यात आले का, हा सवाल उपस्थित केला जात आहे. अधिवेशन रद्द झाल्यानंतर इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या सदस्यांनी भरलेली प्रत्येकी दोन हजार रुपयांची फी परत मागितली आहे.

Exit mobile version