HW News Marathi
मनोरंजन

सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर

मुंबई – यंदाचा व्ही. शांताराम पुरस्कार सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जाहीर झाला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव २०१८ या पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्याम बेनेगल यांनी अंकुर, निशांत, मंडी, भूमिका, मंथन आणि जुनून यासारख्या २८ सिनेमांचे दिग्दर्शन केले असून ४१ माहितीपटांची निर्मिती केली आहे.

तसेच ‘अरोहन’ (१९८२) या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. बेनेगल यांना सिनेमा आणि माहितीपटासाठी नऊ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच २००५मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने ही सम्मानित केले आहे. बेनेगल यांना पद्मभूषण पुरस्काराने ही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#HappyBirthdayLataDi | लतादीदी आयुष्यभर का राहिल्या अविवाहित ?

News Desk

तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना रणावत जखमी

News Desk

वास्तववादी व्यक्तींच्या कर्तृत्वाची जाणीव करुन देणारा पुरस्कार

swarit