HW News Marathi
मनोरंजन

 प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात

पुणे | प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर रोडवर अपघात झाला. या अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले असून आनंद शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे. आनंद शिंदे यांच्यासह ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे -सोलापूर रोडवरील वरकुटे फाटा येथे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र या आपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गायक आनंद शिंदे हे रात्री पुण्याहून सोलापूरला तवेरा गाडीने जात होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास इंदापूरजवळील वरकुटे फाटा येथे यांच्या गाडीच्या चालकाला पुढे जाणारा डंपर दिसला नाही. चालकाने डंपरला पाठीमागून धडक दिली. त्यात आनंद शिंदे यांच्या पायाला मुका मार लागला आहे. त्यांच्यावर इंदापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर ते पुण्याला परतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या जयंतीनिमित्त पालिकेतर्फे जिजाऊच्या पुर्णाकृती शिल्पास पुष्पहार अर्पण

News Desk

वेबसिरिज ‘बॅडमॅन’चीमॉस्को चित्रपट महोत्सवात निवड

News Desk

जय मल्हार फेम देवदत्तनेही मांडली रस्त्याची व्यथा

News Desk