June 26, 2019
HW Marathi
देश / विदेश मनोरंजन

बिग बी अनुभवत आहेत गावाकडच्या गोष्टी

नागपुर | नागराज मंजुळे दिग्दर्शित  ‘झुंड’ या चित्रपटानिमित्त सध्या बॉलीवूड चे बिग बी नागपूरमध्ये शूटिंग करत आहेत. या शूटिंगदरम्यान त्यांना बऱ्याच वर्षांनी गावाकडच्या गोष्टींचा अनुभव घ्यायला मिळत आहेत. अमिताभ बच्चन हे नाव चित्रपट क्षेत्रामध्ये मोठ्या अभिमानाने घेतले जाते . त्यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याचे स्वप्न हे प्रत्येक अभिनेता आणि दिग्दर्शक पाहत असतो.चित्रपटसृष्टीमध्ये बरेच अभिनेते येतात आणि जातात परंतु काही लोक हे कायम स्मरणात राहतात त्यांपैकी एक नाव म्हणजे अमिताभ बच्चन…

अमिताभ बच्चन  हे सोशल मीडिया ट्विटरवरती नेहमी एक्टिव्ह असतात. सध्या ते नागपूरमध्ये शूटिंग करत आहेत त्याबद्दल त्यांनी ट्विट केले आहे. या फोटोंमध्ये ते नागपूरमध्ये बस मधून प्रवास करताना आणि बैलगाडीतून प्रवास करताना दिसत आहेत. खेडेगावात राहत असताना तिथल्या गोष्टींचा ते मनमुराद आनंद लुटत आहेत. बऱ्याच वर्षांनी पुन्हा बसचा प्रवास केला आणि त्यामुळे अमिताभ यांना झालेला आनंद या फोटोंमधून स्पष्टपणे दिसत आहे.

अमिताभ हे झुंड या चित्रपटात एका प्राध्यापकाची भूमिका करत आहेत. या चित्रपटात ते फुटबॉलची टीम तयार करणार आहेत. झोपडपट्टीमधे राहणाऱ्या मुलांच्या फुटबॉलवरील प्रेमावर आधारित हा चित्रपट आहे.

 

Related posts

भारताकडे पाहून अनेक विकसनशील देशही प्रभावित झाले आहेत !

अपर्णा गोतपागर

मुलींच्या होस्टेलमध्ये सापडले कोट्यवधींचे हिरे

News Desk

इसिसच्या दहशतवाद्यांकडून सुन्नी अरबी महिलांवर बलात्कार

News Desk