Site icon HW News Marathi

अखेर मुंबई पोलिसांनी सलमान खानला शस्त परवाना केला जारी

मुंबई | बॉलीवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan )मुंबई पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खानने 22 जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती. यावेळी सलमान खानने मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांच्या कार्यालयात वेपन्सच्या लायसन्ससाठी अर्ज केला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी आज (1 ऑगस्ट) सलमान खानला शस्त्र परवाना दिल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

दरम्यान, प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमान खानचे वडील सलीम खान हे वांद्रे परिसरात मॉर्निंग वॉक गेले असताना अज्ञात व्यक्तीकडून पत्र देण्यात आले. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सलमान खानने शस्त्र परवान्यासाठी मुंबई पोलीसमध्ये अर्ज केला होता.

 

सलमान खानने पोलिसांकडे शस्त्र परवानासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर संघर्ष संघटनेने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सलमान खानला शस्त्र परवाना  देऊ नका, अशी मागणी केली होती. कारण सलमान खानवर हिट अँड रन प्रकरण, काळवीट शिकार प्रकरण आणि चिंकारा शिकार प्रकरण या प्रकरणी त्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद केली आहे. सलमान खानचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्यामुळे शस्त्र परवाना देऊ नका, अशी विनंती केली होती.

 

संबंधित बातम्या

सलमान खाननी ‘या’ कारणासाठी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

 

Exit mobile version