HW News Marathi
मनोरंजन

नागपंचमी विषयी थोडक्यात…

मुंबई | भारतीय संस्कृतीत प्रत्येक सजीवाला महत्व आहे. इथे अनेक गोष्टींची पूजा केली जाते. भगवान श्री कृष्णाच्या प्रिय गाईला गोमातेच्या रूपात पूजले जाते तर बैलाला भगवान शंकराचे वाहन म्हणून पूजले जाते. श्रावण महिन्यात शुक्ल पक्ष पंचमी ही नागपंचमीच्या रूपात साजरी केली जाते. या दिवशी नागांची पूजा करण्याची पद्धत आहे. असे लोक नागदेवाला प्रसन्न करतात आणि आशिर्वाद घेतात.

श्रावण महिन्यातील सर्वात प्रथम येणारा सण म्हणजे नागपंचमी.

आज नागपंचमी उत्सव असल्याने घरोघरी शाडूच्या मातीच्या नागाचे पूजन केले जाते. नागपंचमी निमित्त सापांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. हा सण पुरातन काळापासून साजरा केला जात आहे. घरात रांगोळी करुन दुधाचा लाह्यांचा नैवैद्य नागाला दिला जातो. दिवसभर पूजन केल्या नंतर सायंकाळी परसात आळूच्या पानाखाली या नागाला ठेवले जाते. ही सर्वत्र प्रथा अजूनही सुरु आहे. नागपंचमीच्या आधीच्या दिवशी सुहासिनी वारुळाला जाऊन नागाची पूजा करतात. त्याला दुधाचा व लाह्यांचा नैवेद्य देतात. घराघरामध्ये पातोळे (तांदळाच्या पिठापासून नारळाची किस व गुळ घालून केला जाणारा गोड पदार्थ) घरोघरी बनविल्या जातात. यादिवशी स्वादिष्ट व चविष्ट पदार्थ बनविले जातात.

नागपंचमी सण पुरातन काळापासून साजरा केला जात आहे. याचा अनेक आख्यायिका सांगितल्या जात आहेत. एरव्ही नागाला सर्वजण घाबरतात व त्याला मारण्याचा प्रयत्न करतात पण या दिवशी मात्र नागाची मोठ्या श्रद्धने पूजा केली जाते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नागाची पूजा केली जाते. काही ठिकाणी गारुडी नागाला घेऊन येतात त्या खऱ्या नागाची लोकांकडून पुजा केली जातो. तर काही लोका खास नागाच्या देवळात जाऊन नागाची पूजा करतात. तर काही ठिकाणी शाडुच्या मातीचे नाग करुन ते घरोघरी पूजले जातात. आजही अशा पद्धतीने नागपंचमी साजरी केली जात आहे.

सापांचे संर्वधन गरजेचे –

फक्त सणाच्यावेळी नागाची पूजा नकरता प्रत्येकवेळी सापांचे संर्वधन करणे गरजेचे आहे. आज अनेक प्रजातीचे साप नष्ट होत चालले आहे. या सापाच्या प्रजातींचे संरक्षण गरजेच आहे. विषाच्या तस्करीसाठी सापांची हत्या केली जाते. तसेच लोकवस्तीत घुसलेल्या सापांना जीवे मारले जाते यामुळे आज अनेक सापाच्या प्रजाती कमी झाल्या आहेत. रस्त्यावर गाडीच्या चाकाखाली सापडून अनेक साप मरण पावतात. तसेच अनेक प्रजातीचे साप हे बदलत्या वातावरणामुळे मरण पावत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाॅलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

News Desk

FLASHBACK 2018 : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk

पारंपारीक पोर्तुगीज कलकल

News Desk