HW News Marathi
मनोरंजन

असा महात्मा होणे नाही…

पूनम कुलकर्णी | महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा जोतीराव फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी सर्वत्र साजरी होत आहे. महिलांनी शिक्षण घ्यावे शिक्षणाने महिलांचा उद्धार होईल अशी धारणा ठेऊन स्त्री शिक्षणाची कास धरणा-या महात्मा फुलेंमुळे आज महिला विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पहायला मिळतात. भारतात आज महिला प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत . उंबरठा ओलांडू न शकणा-या महिलांना मुक्त व्यासपीठापर्यंत आणणा-या महात्मांचा स्त्री शिक्षणात प्रचंड मोठा वाटा आहे.

परंतु आज मुलींना उच्च शिक्षणासाठी परराज्यात जावे लागते अशा वेळी त्यांच्यावर अनेकदा जे आत्याचार होतात किंवा बरेचदा उच्च शिक्षित तरुणी दारु कींवा तत्सम प्रकारची नशा करुन अपघाती मृत्यू पावतात. तेव्हा प्रश्न पडतो महात्मांनी ज्यांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले त्याच या जोतीबांच्या लेकी आहेत का? आज भर भक्कम डोनेशन घेऊन शाळा महाविद्यालयात प्रवेश दिले जातात तेव्हा महात्मा फुलेंच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव होते आणि आजच्या काळात शिक्षणाची मोफत सुविधा देणा-या महात्मा जोतिंबांची समाजाला गरज आहे असे वाटते.

हल्लीच्या काळात ९० टक्के शैक्षणिक संस्थांचे मालक राजकीय नेते असतात. शैक्षणिक संस्था या सध्या पैसे कमविण्याचा व्यवसाय झाल्या आहेत. बुद्धी चातुर्यांने मिळालेल्या ज्ञानापेक्षा वाढीव फी भरुन मोठ्या महाविद्यालयात जाण्याचे स्वप्न आजचा प्रत्येक विद्यार्थी पहातो तेव्हा महात्मा फुलेंचे शैक्षणिक योगदान निष्फळ ठरल्याची भावना मनात येऊन जाते. आज पुन्हा एकदा समाजाला गरज महात्मा जोतीबा फुलेंची गरज आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही….

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रणवीर सिंह यांच्या न्यूड फोटोशूटमुळे पोलिसांत गुन्हा दाखल

Aprna

सिध्दार्थ जाधवने केली बीडच्या ८५ अनाथ मुलांना मदत

News Desk

Kumbh Mela 2019 : आज पहिले शाहीस्नान

News Desk