Site icon HW News Marathi

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई | चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी ट्वीट करत माहिती दिली. सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये ‘जाने भी दो यारो’ या सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमातील त्यांचा अभिनय सर्वांना आवडला होता.

अनुपम खेर यांनी ट्वीटमध्ये म्हटले, “मला माहित आहे “मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे.” पण, मी माझ्या जिवलग मित्र #SatishKaushik बद्दल लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.. ४५ वर्षांच्या मैत्रीचा असा अचानक पूर्णविराम. सतीश तुझ्याशिवाय आयुष्य पहिल्यासारखं नक्कीच राहणार नाही.”

सतीश कौशिक यांचा अल्पपरिचय

अभिनेता सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणामध्ये झाला. हिंदी सिनेसृष्टीत येण्याआधी सतीश कौशिक हे नाटकांमध्ये काम करत होते. सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये ‘जाने भी दो यारो’ या सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. वो 7 दिन, मासूम, मंडी या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले.  1987 मध्ये मिस्टर इंडिया सिनेमातील कॅलेंडर या भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही सर्वांच्या मनात घर केले आहे. क्यू की मैं झूठ नहीं आणि मिस्टर अँड मिसेस खिलाडी यासारख्या सिनेमात त्यांनी विनोदी भूमिका साकारली. तसेच सतीश कौशिक यांनी राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है आणि तेरे नाम यासारख्या सिनेमाचे दिग्दर्शक केले. तर दीवाना मस्ताना, साजन चले ससुराल सिनेमात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

 

Exit mobile version