HW News Marathi
मनोरंजन

कंगना राणावतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतचा बिग बजेट सिनेमा ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. मुंबईमध्ये आसनाॅक्स वडाळा थिएटरमध्ये एका भव्य सोहळ्यात हा ट्रेलर लॉन्च केला गेला. या इव्हेंटमध्ये कंगना नऊवारी साडीमध्ये पोहोचली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. तिचा हा पारंपरिक अवतार सर्वांनाच मोहात पाडणारा होता. यानंतर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या प्रचंड चर्चा आहे. कंगनाच्या अदा, तलवारबाजी, करारी बाणा, भव्य सेट सगळेच मोहविणारे आहे. कंगनाचा हा ट्रेलर अंगावर शहारे आणतो. मेरी झांसी नहीं दुंगी हा तिचा करारी बाणा मनात स्फुलिंग पेटवतो. कंगना हीच या चित्रपटाच्या ट्रेलरची ‘जान’ आहे. अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी अशा अनेकांची झलक ट्रेलरमध्ये दिसते. पण खरा भाव खावून जाते ती कंगना. हा ट्रेलर भन्साळींच्या ऐतिहासिक चित्रपटांची आठवण करून देतो, शिवाय कंगनाच्याही मोहात पाडतो. एकंदर ट्रेलर पाहिल्यानंतर प्रत्येकजण कंगनाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#IndianNavyDay : जाणून घ्या… कसे आहे आपले भारतीय नौदल

News Desk

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन

News Desk

भूषण कुमार यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांबद्दल मी माफी मागते !

News Desk