Site icon HW News Marathi

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

मुंबई | लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांचे निधन झाले आहे. सुलोचना चव्हाण यांनी वयाच्या 92 व्या वर्षी सुलोचना चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचना चव्हाण यांनी आज (10 डिसेंबर) दुपारी 12 वाजता फणसावाडी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. सुलोचना चव्हाण यांनी साठ वर्षाहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुलोचना चव्हाण यांची प्रकृती खालावली होती.  सुलोचना चव्हाण यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री त्यांना सन्मानित करण्यात आले होते. लता मंगेशकर पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आले होते.

सुलोचना चव्हाण यांच्यावर आज सायंकाळी मरिन लाइन्स येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.  सुलोचना चव्हाण यांनी ‘सोळावे वरीस धोक्याचे…, ‘उसाला लागलं कोल्हा…’, ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’अशा शेकडो लावण्यांनी त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे.

 

 

 

Exit mobile version